![]() |
श्रीगणेशास आवडणा-या गोष्टी :
१) शस्त्र : शूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद
२) वाहन : उंदीर, मोर, सिंह, वाघ
३) फुले व पत्री : गणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात
४) शमी : हा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात
५) मंदारवृक्ष : मंदारवृक्ष / मुळाच्या काष्ठात श्री गणेशमूर्ती तयार होते, त्याला मंदारगणेश असेही म्हणतात. मंदारवृक्षाच्या काष्टात तयार झालेला नैसर्गिक श्रीगणेश सिद्धीगणेश मानला जातो.
६) भक्त : गणपती भक्तांना गाणपत्य या नावाने ओळखतात. त्याच्यात महागणपती, हरिद्रा गणपती, उचिष्ट गणपती, नवनीत, स्वर्ण व संतान संप्रदाय असे सहा संप्रदाय निर्माण झाले आहेत.
७) गणेश आराधना : चतुर्थी, विनायकव्रत, स्तोत्रपठण, गणेशध्यान, गणेशगायत्री मंत्र, गणेशनामजप व गणेशयाग आदी मार्गांनी गणेश आराधना केली जाते. श्रीगणेशाच्या अभिषेकासाठी अथर्वशीर्ष व ऋग्वेदातील ब्रम्हणस्पत सूक्त म्हणण्याची पद्धत आहे.
- अथर्वशीर्ष : यात अ +अथर्व +शीर्ष हे तीन शब्द येतात. अ = निषेध करणारा, नाही. अथर्व = चंचल होणे. शीर्ष = अंत. या सर्व शब्दांचा अर्थ = जे चंचल होऊ देत नाही व जे अंतिम साध्य आहे ते अथर्वशीर्ष.
- ब्रम्हणस्पत सूक्त : ब्रम्हणस्पती हे गणपतीचे दूसरे नाव आहे. ब्रम्हणस्पत सूक्त म्हणजे श्रीगणेशाचे स्तवण होय.११ अध्याय व ६४ मंत्र असलेले हे ऋग्वेदातील सूक्त ११ ऋषिंनी निर्माण केले.
- गायत्री मंत्र : $ भूर्भुव: स्व: | $ गं गणपतये नम: | एकदंताय विघ्नहे | वक्रतुंडाय धीमही | तन्नो दन्ति प्रचोदयात् ||
- संकटनिरसन स्तोत्र : हे श्रीनारदांनी रचले आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा