१) शिर : धडापासून वेगळे केलेले तेच शिर परत त्या धडाला लावून भगवान् शंकर गणेशाला जिवंत करु शकले असते परंतु त्यांनी तसे न करता हत्तीचे शिर लावले कारण हत्ती सर्व प्राण्यात बुद्धिमान आहे. भगवान शंकराने आपल्या मुलाला बुद्धिमान केले.हत्तीसारखे मोठे शिर 'उदात्त विचार अंगिकारुन बुद्धिमान बना' असा संदेश देते.
२) कान : श्रीगजाननाचे कान सुपाऐवढे मोठे आहेत म्हणून तो शूपकर्ण आहे. सुपातून धान्य पाखडल्यावर फोलपट बाहेर फेकले जाते व उपयुक्त धान्य सुपात राहते. माणसानेही 'जे ऐकावयास योग्य आहे तेवढेच ऐकावे व बाकीचे ऐकून न ऐकल्यासारखे करावे.'
३) सोंड : जमिनीवर पडलेली बारीक सुईसुद्धा हत्तीची सोंड उचलून घेते. 'जे चांगले आहे ते आत्मसात केले पाहिजे'
४) दात : श्रीगणेशाचा संपूर्ण दात 'श्रद्धा' तर तुटलेला दात 'संयम असावा' हा संदेश देतो.
५) मोठे पोट : मोठया पोटाने जे ऐकले ते जवळ ठेवावे कारण जे ऐकले ते बोलून दाखविण्याची सवय हानीकारक असते.
६) पोटावरील नागाचा करगोटा : नागात विष असते. टीकाकारातही टीका करण्याचे विष असते. म्हणून श्रीगणेशासारखे टीकाकारांना अलंकार म्हणून स्वीकारले पाहिजे.
७) हात : श्रीगणेशाचे सहा हात सहा शास्त्र तर चार हात चार वेद होत.
८) मोदक : मोदक हे आनंदाचे प्रतिक आहे.
९) अंकुश : वासना व विकार यांचा नाश करण्याचे सामर्थ्य.
१०) पाश : शिस्त
११) बैठक : फिरतो तो दु:खी होतो म्हणून श्रीगणेशाची बैठक स्थिर आहे.
3 comments:
या माहितीमुळे माझ्या ज्ञानात भ्रर पडली. सहा शास्त्र कोणती ती कंसात नमूद करावी असे वाटते. व चार वेद सुध्दा....
सुंदर माहिती पुरविल्याबददल धन्यवाद.
धन्यवाद राजश्री,
चार वेद व सहा शास्त्रे (म्हणजेच वेदांगे)व हे 'ॐ कार स्वरूप श्रीगणेशाच्या १४ विद्या व ६४ कला...'या पोस्टमध्ये सविस्तर दिले आहेत.
संकट निरसन स्तोत्र उपलब्ध करुन द्यावे, ही विनंती
टिप्पणी पोस्ट करा