ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ०७ : धोतरा


६) धोतरा   (Datur Stramonium)

" हरसूनवे नम: । धत्तुरपत्रं समर्पयामि ।। "


वैशिष्ट्य : 

महादेवाच्या पूजेत धोत-यास महत्त्वाचे स्थान आहे. शंकरास प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या पूजेत धोत-याचे फळ आणि फूल वापरले जाते.

सर्वसाधारण वर्णन :


धोतरा ही क्षुद्रवर्गीय वनस्पती असून ती नऊ उपविषांत गणली जाते. धोत-याच्या काळा, पांढरा आणि राजधोत्रा असे तीन प्रकार आढळतात. पांढरा धोतरा हा पूजेमध्ये वापरण्यात येतो. याचे झाड साधारणत: एक मीटरपर्यंत वाढते. धोत-याची पाने दातेरी, लांब व एकाआड एक असून रंगाने हिरवट असतात. या झाडास मोठी पांढरी हे पडिक जागेत आढळणारे क्षुप आहे. हे विषारी आहे. काटेरी फळ, पांढरी लांब नरसाळ्यासारखी फूले येतात. फुलांना दलपुंज्याची दोन मंडले असतात. फळ काटेरी व अंडाकृती असते.


औषधी उपयोग :


धोतरा औषधी असला तरी तो विषारी असल्याने खाल्ला जात नाही. दमा, आकडी, फुफुसाच्या नळया सुजणे, स्नायूंचे झटके यावर गुणकारी आहे. धोत-याची पाने व खोड वाळवून त्याचा धूर नाकाने घेतल्यास दम्यावर आराम पडतो. धोत-याच्या पानांबरोबरच बीया देखील औषधी असतात वेदनाशामक म्हणूनही याचा उपयोग होतो. कानदुखीवर फळांचा रस कानात घालतात. श्वसनसंस्थेशी संबंधित आणि नेत्रविकारावर धोतरा उपयुक्त आहे. शरिरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे यात धोतरा प्रभावी ठरतो. धोतरा पिकांवर पडणा-या रोगांवर नियंत्रक म्हणूनही काम करतो.

कथा :

धोतरा हा नऊ उपविषांपैकी एक असला तरी तो शंकरास अत्यंत प्रिय आहे. शंकराच्या पूजेत धोतरा अर्पण केला जातो कारण एकदा समुद्राच्या पोटातील अमृत मिळविण्यासाठी देव आणि दैत्यांनी मिळून समुद्रमंथन करायचे ठरविले. मंथनासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली व देव आणि दैत्य मिळून समुद्र घुसळू लागले. मंथन होत असताना अमृत बाहेर पडण्याआधी विष / हलाहल बाहेर पडले. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या वीषाचा सृष्टीला त्रास होऊ नये म्हणून शंकराने ते वीष स्वत: प्राशन केले व आपल्या कंठात ते धरुन ठेवले. शंकराने वीष प्राशन केल्याने त्यांना नीलकंठ असे नाव पडले. त्या वीषाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून काही विषारी वनस्पती व प्राणी निर्माण झाले. त्यापैकीच एक धोतरा ही वनस्पती.

(संदर्भ : आंतरजालावरून साभार ).
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters