८) माका / भृंगराज (Eclipta Alba)
"गणाधीशाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।।"
वैशिष्ट्य :
माक्यालाच भृंगराज असेही म्हणतात. भृंगराज म्हणजेच भुंग्यासारखे काळे केस देणारा; म्हणूनच माका / भृंगराज ही केसांसाठी बहुपयोगी वनस्पती आहे असे दिसते.
सर्वसाधारण वर्णन :
ही एक झुडूपवर्गीय वनस्पती असून दलदलीच्या भागात माक्याचा अधिवास आढळतो. माक्याची श्वेत माका व पीत माका असे दोन प्रकार आढळतात. माक्याची पाने देठविरहित असून समोरासमोर असतात. याची फुले बारीक, पांढरी असून ती सूर्यफुलासारखी दिसतात.
औषधी उपयोग :
माका ही उष्ण वनस्पती असून पाचक, कृमीनाशक व कफवातनाशक आहे. यकृताशी संबंधित आजारांमध्ये माका बहुउपयोगी आहे. विंचूदंशावर देखील माक्याचा लेप लावला जातो. चयापचय क्रिया, केसांशी संबंधित तक्रारी, त्वाचाविकार, मूळव्याध, कावीळ, सूज यावर माका गुणकारी ठरतो. माक्याला केशवर्धक वनस्पती म्हणूनही ओळखले जाते. केसांच्या तक्रारींवर माक्याचा लेप व तेल गुणकारी ठरतात. माक्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कथा :
माका / भृंगराज याबाबत कथा उपलब्ध झालेली नाही.
(संदर्भ : आंतरजालावरून साभार ).
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा