" विघ्नराजाय नमः। विष्णुकांत पत्रं समर्पयामि।। "
वैशिष्ट्य :
विष्णुकांत / शंखपुष्पी या वनस्पतीचे सकाळी-सकाळी अचानक दर्शन झाल्यास काहीतरी मंगल घडते असा समज आहे. अभ्यासात मंद असणा-या विद्यार्थ्यांसाठी शंखपुष्पी वनस्पती ही अत्यंत बुद्धीवर्धक ठरते. हिला स्मृतीसुधा असेही संबोधतात.
स्वरूप :
शक्यतो माळरानात आढणारी ही वनस्पती दिर्घायू असून छोट्या गवतासारखी वाढत जाऊन जमिनीलगत आसपास पसरते. या वनस्पतीचा आकार शंखासारखा असल्याने त्यास शंखपुष्पी असे नाव पडले असावे. लाल / पांढरी / निळी अशा प्रकारच्या फुलांच्या वर्गीकरणानुसार या वनस्पतीचे तीन प्रकार आढळतात.
याची मूळे करंगळीएवढी असून १-१ इंच उंचीची असतात. शंखपुष्पीची पाने एकाआड एक, १ ते ४ सें.मी. लांब व तळाकडे निमूळती होत जाणारी व रेशमी केसांनी आच्छादलेली असतात. फळे छोटी, गोलसर व चमकदार असतात. शंखपुष्पीच्या आंतर्सालातून व लाकडामधून दूधासारखा पांढरा द्रव निघतो. याच्या फांद्या सुतळीसारख्या पातळ असतात.
उपयोग :
शंखपुष्पी ही वनस्पती बुद्धिवर्धक, तेजवर्धक व शक्तीवर्धक असून वातपित्तशामक आहे. कावीळ, अनिद्रा, ज्वर, वातसंबंधिक विकार, गर्भाशय व मेंदूशी संबंधित विकारांवर ही वनस्पती गुणकारी ठरते. ही जंतनाशक असून अमांशावर गुणकारी ठरते.
कथा :
विष्णुकांत / शंखपुष्पी याबाबत कथा उपलब्ध झाली नाही.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा