ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

नलराजाची गणेशभक्ती ...


पूर्वी निषध देशात 'नल' नावाचा राजा होता. तो वेदवेत्ता, ऋषीमुनींचा आदर करणारा होता. त्याने अनेक अस्त्र संपादित केली होती व त्रैलोक्यात गमन करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी होते. 'दमयंती' नावाची त्याची लावण्यवती पत्नी होती. सुंदर पदार्थांचे दमन करून, त्याचे सार कडून ब्रह्मदेवाने तिला निर्माण केलं असल्याने तिला दमयंती असे नाव प्राप्त झाले होते. त्रेलोक्यातील सुंदर स्त्रियांच्या गर्वाचं दमन करणारी ती दमयंती, असही तिला म्हटलं जातं. नलराजाचा बृहस्पतीप्रमानं बुद्धिमान, अंगिरसासारखा नीतीमान, मेरुसारखा उद्दात्त, समुद्रासारखा गंभीर असा 'पद्महस्त' नावाचा प्रधान होता. 

एके दिवशी नल राजा सभेत बसला असता, गौतमऋषी  तेथे आले. हे पाहून नल राजा त्यांना समोर गेला आणि त्याने त्यांची अर्ध्यपाद्यादिकांनी पूजा केली. नंतर त्यांना नलराजाने विचारले, " मी इथे जो एवढ्या ऐश्वर्याचा उपभोग घेत आहे तो कोणत्या पुण्याईमुळे?" यावर गौतमऋषी यांनी नल राजास त्याचा पुढीलप्रमाणे पूर्वजन्मवृतांत सांगितला.

" गौंड देशाच्या पलीकडील देशामध्ये पिप्पल नामक नगरात तू पूर्वी दरीन्द्री, ज्ञानवान व पवित्र क्षत्रिय होतास. तुला पत्नी, अपत्ये त्याबद्दल दुषणे देत असत. तेव्हा एके रात्री तू कोणालाही न विचारता कंटाळून एका निबिड अरण्यात गेलास. तिथे भटकत असताना तुला एक आश्रम दिसला. तपोनिधी कौशिकांचा तो वेद्घोशांनी दुमदुमून गेलेला आश्रम होता. तिथे जाऊन मोठ्या भक्तीभावाने तू त्यांना प्रणाम केलास.  त्यावेळी तू दु:खी आहेस असं जाणून त्यांनी तुला आशीर्वाद दिला, 'माझा देवाधिदेव तुझं कल्याण करील.' त्यानंतर तू त्यांना सर्व इच्छा प्राप्त करून देणारा, भोग व मोक्ष देणारा असा उपाय विचारलास. 

तेव्हा कौशिकांनी तुला गणेशाची आराधना सांगितली. मुर्तीकेची (मातीची) गणेश मूर्ती करून तिची रोज पूजा करायला सांगितली. श्रावण शुद्ध चतुर्थीस या व्रताचा आरंभ करायला आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत समाप्ती करायला सांगितले. यालाच वरद विनायक व्रत असे म्हणतात.

त्याप्रमाणे तू आपल्या घरी गेलास आणि उपदेशाप्रमाणे गणपतीची आराधना केली. तुला त्रिकाळ गजाननाचा ध्यास लागून राहिला होता. एक महिनाभर भक्तीभावाने हे मासव्रत केल्याने तुझे दारीन्द्र नाहीसे झाले. हत्ती घोडे दाराशी उभे राहून मोठे वैभव प्राप्त झाले. नंतर तू गणेशाचे एक सुंदर मंदिर बांधले. मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने मासव्रत पूर्ण केल्याचाच हा प्रभाव आहे."
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters