ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

इंद्राचे गर्वहरण...

मयुरेश  १४ वर्षांचा झाला असता गौतमादी ऋषी शंकरांच्या दर्शनासाठी आले. ऋषीमुनींची यथाविधी पूजा करून पार्वती त्यांना म्हणाली, "विघ्नांच्या भयाने आम्ही त्रिसंध्या क्षेत्र सोडले. परंतु, माझ्या बालकावर इथेही अनेक संकटे आली. तेव्हा आपण विघ्ननाशक असं एखादे कर्म आणि उत्तमस्थान मला सांगा." त्यावर मुनी म्हणाले, "देवी, इंद्रयाग केला असता सर्व संकटांचे हरण होईल. "

त्याप्रमाणे पार्वतीने शंकरांची आज्ञा घेउन ऋषींना निमंत्रणे देऊन इंद्रयागाला आरंभ केला. ब्राह्मण चारी वेदातील शांतिपाठ म्हणत होते. इतक्यात कल आणि विजय असे दोन दैत्य रेड्यांची रूपे घेऊन तिथे आले आणि आपापसात लढू लागले. गणेशाने त्यांना दुरूनच पाहिले. त्याने लगेचच त्या दोन्ही रेड्यांची शेपटे धरून त्यांना गरगर फिरवले आणि आकाशात फेकून दिले. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.

नंतर गणेश यज्ञमंडपात शिरला आणि त्याने "बोकडाची कितीही पूजा केली तरी तो की कामधेनूप्रमाणे फल देणार आहे?" असे बोलून अहुतीसाठी तयार ठेवलेले पायसादी सर्व खाऊन टाकले. मुनींनी पर्वतीकडे नुसते पाहिले व आपण याला बोलायलाही असमर्थ आहोत असे सुचवून ते घरी गेले. 

ही घटना ऐकून इंद्राला मोठा राग आला आणि सर्व देवसमूहास बोलावून तो म्हणाला, "माझा याग मुनीगणांनी मोठ्या आदराने सुरु केला होता. पण गणेशाने त्याचा विध्वंस केला. आता आज मी त्याचे सामर्थ्य पाहतो." आणि मग इंद्राने देवास आज्ञा केल्या.

प्रथम अग्नीस आज्ञा केली कि, "मयुरेश नगरात तुझं कुठेही वास्तव्य होता काम नये. सर्वांच्या जठरात राहणारा तुही माझ्या आज्ञेने मलीन हो." याप्रमाणे रागावलेल्या इंद्राचे बोलणे ऐकून अग्नी त्या नगरातून आणि तेथील लोक्नाच्या जठरातून नाहीसा झाला. मुनींना जेव्हा अग्नी दिसलाच नाही तेव्हा ते होमाकरिता अग्नीचे मंथन करू लागले, पण तो मुळीच येईना. शेवटी त्यांनी न शिजवलेले अन्न खाल्ले. पण त्यांच्या उदरातही अग्नी नव्हता. त्यामुळे ते अन्न त्यांना पचेना. पोटात व्यथा होऊ लागल्या. नंतर ते सर्व मुनी कृपावंत मयुरेश्वराकडे गेले. त्याला नमस्कार करून ते म्हणाले, "इंद्राच्या यज्ञाचा तू ध्वंस केलास, त्यामुळे त्याच्या बोलावण्यावरून अग्नी निघून गेला. आमचा जठराग्नीही नाहीसा झाला. " त्यांचे हे बोलणे ऐकून मयुरेश प्रत्येकाच्या जठरातील अग्नी झाला. त्याचबरोबर ते सर्व भुकेने व्याकूळ झाले. स्वयंपाकगृहे वा कुंडे यातही अग्नी प्रज्वलित झाला. 

याचा  इंद्रास राग आला त्याने वायुस बोलवून घेतले. त्यामुळे नगरीतील सर्व लोकांचे पंचप्राण गेले व ती नगरी प्रेतरूप होऊन गेली. मग मयुरेशच पंचप्राण झाला वा त्याने सर्वाना सजीव केले. 

नंतर इंद्राने सूर्यास त्या नगरीस तप्त करून सोडण्याची आज्ञा केली. त्यामुळे सूर्य त्या नगरीस जाळू लागला. सर्व प्रकारचे पाणवठे शुष्क झाले. पण लगेचच मयुरेशाने मेघ होऊन सर्वत्र वर्षाव केला. त्या अग्नीस शांत केले आणि मेलेल्यांना जिवंत केले. 

तात्पर्य इंद्राने जे जे केले त्याच्या बरोबर प्रतिकूल मयुरेशाने केले. हे पाहून इंद्र मयुरेशाकडे आला आणि हात जोडून त्याची स्तुती करू लागला. मयुरेशाने त्याचे मन शुद्ध झाले आहे हे पाहून त्याचे कल्याण चिंतले व मग इंद्र स्वस्थानी गेला.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters