गणेशाला पंधरावे वर्ष लागले होते. एके दिवशी तो आपल्या सवंगड्यांसह कमंडलू नदीवर स्नानासाठी गेला होता. त्या ठिकाणी एक राक्षस भयंकर अश्या वाघाचे रूप घेऊन आला. त्याला पाहताच त्याचे सवंगडी पळून पळून गेले.
गणेश मंदिराच्या गाभाऱ्यात होता. तो दैत्यरूप वाघ दार फोडून आत शिरला. तेव्हा सिंहासारखे रूप घेऊन गणेश त्याच्यावर चालून गेला. वाघ पुढे पळू लागला सिंह त्याचा पाठलाग करू लागला. शेवटी पळता-पळता वनातील एका झुडूपात दैत्यरूपी वाघ लपून बसला. सिन्हरूपी गणेश त्या झुडूपाशेजारील वृक्षावर चढला व त्या वाघावर त्याने धप्पदिशी उडी टाकली. दोन्ही हातांनी त्याचे मुख धरले आणि परशूने त्याचे नाक, कान, पाय, शेपूट तोडून टाकले आणि त्याला सोडून दिले. तो गणेशास म्हणाला, "मीही तुझी अशीच अवस्था करीन."
इकडे वाघाच्या भीतीने मुळे पळता पळता दमली व एका वृक्षाच्या खाली निजली. पण ती सर्व मुळे दक्षिणेकडे पाय करून निजली असल्यामुळे यमाला राग आला व त्याने त्या सर्व मुलांना यमलोकी नेले.
गणेशाने अंतर्ज्ञानाने सारा प्रकार जाणला आणि लगेच यमलोकी जाऊन त्याने यमाच्या खांद्यावर पटकन उडी मारली आणि त्याला रेड्यावरून पाडून गणेश यमाच्या अंगावर चढला. तेव्हा त्याचा पराक्रम पाहून यमाने हात जोडले व भक्तीने देवाधिदेव मयुरेशाची स्तुती केली. सर्व बालकांस आणून त्याने गणेशाच्या स्वाधीन केले.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा