ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ११ : आघाडा



१०) आघाडा  (Achyranthes Aspera)


" गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य :

आघाड्यास अनेक फांद्या असल्याने वीथीदंती असेही म्हणतात. आघाडा हा प्राणशक्ती प्रदान करणारा असून तो पापांचे हरण करणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो.


सर्वसाधारण वर्णन :

आघाडा ही पावसाळ्यात आपोआप उगवणारी वनस्पती असून मोकळया पडीक जागी वा कच-याच्या ढिगा-याच्या आसपास वाढते. आघाडयाची उंची साधारणत: ६०-१२० सेमी असते. याचे पान हृदयाच्या आकाराचे असून वरून हिरव्या रंगाचे असते आणि मागील भाग पांढरट असतो. पानांच्या खालच्या बाजूला मऊ लव असते. फांद्यांच्या टोकांना हिरवट पांढरी फुले येतात. फळे लहान असतात.‍ 

औषधी उपयोग :

आघाडा ही वनस्पती औषधांची स्वामिनी आहे. आघाड्याचे मूळ, खोड, पान, फुल आणि फळ औषधात उपयुक्त असते. आघाडा विषद्रव्यांचा नाश करणारी वनस्पती असून पाचनशक्तीवर्धक, रुचिकारक, पिडानाशक आहे. आघाडयाची पाने अतिसार व अमांश यावर तर बिया वांती व आलर्क रोगावर गुणकारी ठरतात. आघाड्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे इतर पालेभाज्यांप्रमाणे आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.


आघाडयाचा रस तिखट, व मूत्रवर्धक असून मूळव्याध, गळवे, त्वचाविकार इ. व्याधींसाठी गुणकारी असतो. या वनस्पतीची राख घसा व श्वसनसंस्थेशी संबंधित विकारांवर व कानदुखीवर गुणकारी असते. मूळ उगाळल्यास विंचू दंशावर व कुत्र्याच्या विषावर उपयुक्त ठरते. झाडाच्या काडया दात घासण्यासाठी वापरल्या जातात.


कथा  :

पूर्वी इंद्रादी देवांनी राक्षसांना मारण्यासाठी या वनस्पतीचा विनियोग केला. दानाने नटलेल्या इंद्राने या वनस्पतीस आपल्या उजव्या हातात धारण केले आहे.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters