११) रूई / मांदार (Calotropis Spicigera)
" विनायकाय नम: । मान्दारपुष्प समर्पयामि।। "
वैशिष्ट्य :
मांदार / रुई हा श्रवण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. मारुती व शनीला रुईची पानांची माळ घातली जाते. रुईचा चिक विषारी असून तो डोळयात गेल्यास अंधत्व येते असे म्हणतात. एखाद्या वराचा वा वधूचा अपमृत्यू होऊ नये म्हणून त्या वर/वधूचे प्रथम ‘रुई’च्या झाडाशी लग्न लावण्याची प्रथा अनेक जमातींमध्ये आहे. अशा विवाहाला ‘अर्क विवाह’ असे म्हटले जाते.
सर्वसाधारण वर्णन :
रुईला ‘अर्क’ असेही म्हणतात, अर्क म्हणजे सूर्य. रूई या झाडाचे दोन प्रकार आहेत. जांभळया फुलांची रुई व पांढ-या फुलांची रूई. पांढ-या फुलांच्या रुईलाच मांदार असेही म्हणतात. रूईचे झाड १-२ मीटर उंचीचे असून पाने आयताकृती असतात. फुले पांढरट तर फळ वांगी रंगाचे असते. फळ वाळल्यानंतर आपोआप फुटते आणि त्यातून मऊ कापूस बाहेर पडतो. रुईच्या कळया हवाबंद फुग्यांसारख्या असतात व फळे करंजीसाच्या आकारासारखी असून त्यात मुलायम बिया असतात.
औषधी उपयोग :
कफ, पोटाचे विकार यावर गुणकारी. हत्तीरोग, कुष्ठरोग, न्युमोनिया, दमा, गुडघेदुखी या विकारांवर उपयुक्त. तोंडाला खूप लाळ सुटणे, मूळव्याध, खोकला, दमा, अपचन यात रुई गुणकारी आहे. जलद प्रसुतीसाठीही रुई उपयुक्त मानली जाते. काटा रुतलेल्या भागावर रुईच्या देठाचा चिक लावल्याने काटा लवकर बाहेर येतो.
कथा :
कथा उपलब्ध झाली नाही.
(संदर्भ : आंतरजालावरून साभार ).
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा