१३) मरवा (Origanum Majorana)
" भालचंद्राय नम: । मरुबकं समर्पयामि।। "
वैशिष्ट्य :
मरवा ही एक अत्यंत सुवासिक वनस्पती आहे. हिंदू धर्मात ज्याप्रमाणे तुळशीस महत्त्वाचे स्थान आहे त्याप्रमाणे मुस्लिम धर्मात मरवा पवित्र मानला जातो.
सर्वसाधारण वर्णन :
मरवा हे कुंडीत उगवणारे छोटेसे रोपटे असून ते एक अत्यंत सुवासिक वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. २० ते ३० सें. मी. उंचीचे हे आटोपशीर झुडूप कडक खोड व मऊ कोवळ्या फांद्या असणारे असते. मरव्याची पाने गोलाकार, काहीशी जाडसर असतात. २ सें.मी. लांबीची पाने नरम, हिरवी व गोड वासाची असतात. पानांच्या बेचक्यात लंब गोलाकार लहान पानांसारखीच दिसणारी हिरवी फुले असतात.या पिकाला वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
औषधी उपयोग :
मरव्याच्या पानांपासून सुगंधी तेल तयार करतात. पोटदुखी व तापावर मरवा वापरतात. फुले व पाने यांच्यापासून तेल काढतात. जखमांमुळे, भाजल्याने किंवा कोणत्याही कारणाने त्वचेवर पडणा-या डागांवर उपयुक्त ठरतो. याचा उपयोग सुगंध निर्मिती व सुगंधोपचार यामध्ये केला जातो. जुनाट खोकला, दमा यावर मरव्याच्या पानांची वाफ घेतात.
कथा :
मरवा याबाबत कथा उपलब्ध झालेली नाही.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा