ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १६ : अगस्ती / हादगा


१४)अगस्ती / हादगा   (Sesbania Grandiflora)


" सर्वेश्वराय नम: । अगस्ती पत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य :


कोकणात या वृक्षास हादगा असे म्हणतात. अगस्त्य म्हणजे चैतन्याचा विस्तार. अगस्ती पुष्प परमेश्वरास वाहिल्यास चैतन्याचा विस्तार तर होतोच शिवाय अनेक वर्षे तपस्या करून जे वरदान प्राप्त होत नाही ते केवळ अगस्ती / हादगा याच्या फुलांनी परमेश्वराची पूजा केल्यास प्राप्त होवू शकते असे म्हणतात.


सर्वसाधारण वर्णन :


अगस्ती / हादगा हा वृक्ष १० ते १५ फूट उंचीचा असला तरी तो नाजूक असतो व त्याचे आयुर्मान ३-५ वर्षांपेक्षा जास्त असत नाही. या वृक्षाचे दोन प्रकार आढळून येतात. एका प्रकारच्या झाडास पिवळट पांढरी फुले येतात तर दुसऱ्या प्रकारच्या झाडास गुलाबी / लालसर रंगाची फुले येतात. पाकळयांनी गच्च भरलेली ही फुले पूर्णत: उमलत नाहीत. पाने चिंचेच्या झाडाप्रमाणे असून यास शेंगादेखील येतात.


औषधी उपयोग :


हादगा पित्त, वात व कफनाशक असून पौष्टीक व शक्तीवर्धक आहे. हादग्याच्या पानांमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. हातग्याच्या फुलांची व शेंगाची भाजी करतात जी नेत्रविकारावर तसेच शरिरस्वास्थासाठी गुणकारी ठरते. हादगा ही वनस्पती सर्दी, डोकेदुखी, नेत्रविकार, मिरगी, वायुविकार, पोटदुखी, त्चचाविकार आदींवर गुणकारी ठरते. मात्र अगस्ती / हादगा याचे अति सेवन झाल्यास ते पोटाच्या विकारास कारणीभूत ठरते.

हादग्याची झाडे शेताच्या बांधावर सरळ रेषेत लावल्यास शेतातील पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्याचे काम ही झाडे करतात म्हणून त्यांना wind binder असेही म्हणतात. शिवाय झाडाची पाने जनावरांना खावू घालण्यास, सरळ व उभी खोडे शेतीच्या अवजारांचे दांडे म्हणून व लाकूड आगपेटीच्या कड्या बनवण्यासाठी व जळण म्हणूनही वापरतात.
 

कथा  : 

अगस्ती / हादगा याबाबत कथा उपलब्ध झालेली नाही.

(संदर्भ : बहुगुणी वृक्ष  - डॉ. पी. बी. वांगीकर ; आंतरजालावरून  साभार )
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters