१6) करवीर / कण्हेर (Neriam Indicum)
" विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।।"
वैशिष्ट्य :
करवीर म्हणजे कण्हेर. नऊ उपविषात याचा समावेश होतो. विषारी असल्याने कण्हेरीकडे पक्षी, प्राणी आकर्षित होत नाहीत. गायी, म्हशी, बक-या चरायला सोडल्यास त्याही या झाडाचा पाला खात नाहीत.
पांढ-या कण्हेरीच्या फुलांची माळ महादेवास घातल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच कण्हेरीची फुले गणपती व सूर्यालाही वाहतात. तंत्रशास्त्रानुसार, अमावस्येच्या मध्यरात्री पांढ-या कण्हेरीच्या झाडाखाली बसून शिव आराधना केल्यास अत्यंत फलदायक ठरते तर पांढ-या कण्हेरीची फुले आणि हळद एकत्र वाटून त्याचा टिळा कपाळावर लावल्यास वशीकरणात यश येते असेही म्हटले जाते.
हिंदू धर्मात अत्यंत कठीण अश्या संकटाच्या निवारणार्थ 'करवीर व्रत' केले जाते. स्त्रियांसाठी हे व्रत तत्काळ फळ देणारे आहे. हे व्रत सती मानल्या जाणा-या सावित्री, सत्यभामा व दमयंती यांसारख्या स्त्रियांनीही केलेले आढळते. कान्हेरीच्या झाडाची पूजा करून हे व्रत केले जाते.
सर्वसाधारण वर्णन :
कण्हेर विशेषत्वाने कमी पाणी असणा-या ठिकाणी आढळते. कण्हेरीच्या झाडाची वाढ तीन मीटरपर्यंत होते. पांढरी, लाल व पिवळी फुले वर्षभर देणारे सदापर्णी पण विषारी असे हे झुडूप आहे. वेगवेगळ्या रंगछटांनी डवरलेली कण्हेरी ची फ़ुले एकेरी, दुहेरी व तिहेरी पाकळीची असून मंद सुगंध देणारी असतात. पाने साधारणत: लांबट आकाराची ४-६ इंच व पातळ असतात. नऊ उपविषात कण्हेरीचा समावेश होत असल्याने याचे सर्वच भाग विषासी असतात. कण्हेरीची साल, फळ, फूल आणि पाने तोडल्यास विषारी दूध / चिक निघतो.
कण्हेरीचे पिवळी, लाल/गुलाबी व पांढरी असे तीन प्रकार आढळतात त्यापैकी पिवळया कण्हेरीच्या झाडाखाली साप तर लाल कण्हेरीच्या झाडाजवळ विंचवासारखी विषारी प्राणी असतात आणि पांढ-या कण्हेरीजवळ पांढ-या मुंग्या असतात ज्यांच्या दंशाने ऍ़लर्जीसारखे विकार होतात.
कण्हेरीचे पिवळी, लाल/गुलाबी व पांढरी असे तीन प्रकार आढळतात त्यापैकी पिवळया कण्हेरीच्या झाडाखाली साप तर लाल कण्हेरीच्या झाडाजवळ विंचवासारखी विषारी प्राणी असतात आणि पांढ-या कण्हेरीजवळ पांढ-या मुंग्या असतात ज्यांच्या दंशाने ऍ़लर्जीसारखे विकार होतात.
औषधी उपयोग :
पाळीव प्राण्यांना किडे झाल्यास अथवा त्यांना त्वचेशी संबंधित आजार झाले असल्यास पांढ-या कण्हेरीची हिरवी पाने एरंडेल तेलात जाळून त्याची राख प्राण्यांना लावली जाते.
आर्युवेदात पांढ-या कण्हेरीस अत्यंत महत्त्व आहे मात्र विषारी असल्याने काळजीपूर्वक वापरावी. पांढ-या कण्हेरीची पाने भाजलेल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतात. तसेच यामुळे भाजल्यानंतर पडलेले पांढरे डागही कमी होतात. कण्हेरचे साल व मूळ महारोगात उगाळून लावले जाते. सुजलेल्या भागावर या पानांच्या काढ्याने शेकले, तर आराम पडतो. डोळयांचा दाह होत असल्यास, सूज आल्यास कण्हेरीच्या ताज्या पानांचा वापर करतात. कण्हेर ही जखमा, जंत आणि खाज यांचा नाश करणारी आहे. विंचूदंशावर उपयुक्त असून मुळव्याध, सूज यावर गुणकारी.
करवीर / कण्हेर याबाबत कथा उपलब्ध झालेली नाही.
(संदर्भ : आंतरजालावरून साभार )
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा