पुराणांचा वेध घेतला असता, भगवान शंकरांनी १९ अवतार तर श्रीविष्णूंनी २४ अवतार घेतल्याचे दिसून येते. श्रीगणेशाने देखील असुरांचा नाश करण्याकरीता अनेक अवतार घेतल्याचे आढळून येते.
मुद्गल पुराणानुसार गणेशाने ८ प्रमुख अवतार घेतले घेतले आहेत. श्रीगणेशाने हे अष्टावतार त्रिलोकास असुरांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी घेतलेले आहेत. गणेशाने घेतलेले अवतार व त्या अवतारकार्यात संहार केलेले असुर यांचा तपशिल खालीलप्रमाणे :
१. वक्रतुंड अवतार मत्सरासुराच्या
संहारासाठी
२. एकदंत अवतार मदासुराच्या
संहारासाठी
३. महोदय अवतार तारकासुराच्या
संहारासाठी
४. गजानन अवतार लोभासुराच्या
संहारासाठी
५. लंबोदर अवतार क्रोधासुराच्या
संहारासाठी
६. विकट अवतार कामासुराच्या
संहारासाठी
७. विघ्नराज अवतार ममासुराच्या
संहारासाठी
८. धुम्रवर्ण अवतार
अहमासुराच्या संहारासाठी
या अष्टावतारामध्ये श्रीगणेशाने कोणत्याही असुराचा वध केलेला नाही. याउलट असुरांमध्ये असलेल्या दुर्गुणांचा नाश करुन त्यांना सरळमार्गावर आणले व आपल्या अंकित ठेवल्याचे दिसून येते.
पुढील पोस्टमध्ये श्रीगणेशाच्या अष्टावतारांच्या कथा सविस्तर पाहूयात...
'श्रीगणेशाचे विविध अवतार' वाचण्यासाठी क्लीक करा
'अष्टावतार श्रीगणेशाचे भाग १ : वक्रतुंड' वाचण्यासाठी क्लीक करा
~*~
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा