ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

शेष (नाग) गजाननाच्या उदरी...


शेषाचे गर्वहरण : एकदा शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावरील एका रम्य उद्यानात विश्रांती घेत बसले होते. त्या उद्यानात सर्वत्र वसंताचे साम्राज्य पसरलेले होते. त्या वेळी देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर इत्यादी शंकरांच्या दर्शनास आले. त्यांनी स्तुती करून त्याची पूजा केली. ते सर्व पाहून शेषाच्या मनात असूया निर्माण झाली. तो गर्वाने म्हणाला, " मी प्रत्यक्ष या शंकराच्या डोक्यावर बसलेलो आहे, पृथ्वीचा भार पेलण्याचे सामर्थ्य माझ्याशिवाय कोणासही नाही. देवही अमर होण्यास कारण मीच आहे. असे असूनही हे सर्व माझी स्तुती करीत नाहीत. "

शेषाला गर्व झाला आहे हे शंकराच्या ध्यानात आले. काही एक न बोलता शंकर उभे राहिले. त्यामुळे गर्वाने बेसावध झालेला शेष कैलासावरून धडपडत खाली येऊन जमिनीवर आपटला. त्याचे तोंड फुटून त्याच्या हजार चीरफळ्या झाल्या. त्याबरोबर त्याचा गर्व नाहीसा झाला. आपल्याला पूर्वीचे स्थान कसे प्राप्त होईल याची तो चिंता करू लागला. इतक्यात नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी त्याच्या या अवस्थेचे कारण विचारले.

नारदाला शेषाने सर्व सांगितले आणि आपली गात्रे पृथ्वी धारण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. नंतर त्याने अगतिक होऊन आपणास पूर्वीप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होण्यास कोणता उपाय करावा ते विचारले. त्यावर नारद म्हणाले, " तू गणपतीची आराधना कर. मी तुला षडाक्षर मंत्र सांगतो. याचा जप केलास तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील". 

धरणीधर गजाननाची स्थापना : नारदाच्या उपदेशाप्रमाणे शेषाने सहस्त्र वर्षांपर्यंत  गजाननाची तपश्चर्या केली, तेव्हा गजानन प्रसन्न झाले आणि त्याला "वर माग" असे म्हणाले. ते ऐकून शेष म्हणाला , "देवाधिदेवा, तू तुझी भक्ती मला चिरकाल दे. तू सर्वज्ञ आहेस. मी तुला काय सांगावे? तुझी स्तुती करताना माझ्या सहस्त्र जिव्हा धन्य झाल्या. मी गर्व केल्यामुळे महेशाने मला जमिनीवर आपटले. देवा, मला पुन्हा त्रिभुवनात श्रेठत्व दे आणि पृथ्वीचा भार शिरावर वाहण्याचे सामर्थ्य दे. शिवाच्या ठिकाणी माझी भक्ती जडो" हे ऐकून गजाननाने "तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील" असा वर दिला.

ज्या ठिकाणी शेषाने आराधना करून वर मिळवला त्या ठिकाणी एक सुंदर मंदिर बांधून त्यात त्याने गणपतीची स्थापना केली व त्या मूर्तीस 'धरणीधर' असे नाव दिले. गजाननाच्या आराधनेमुळे शेष विष्णूस प्रिय झाला आणि शंकरानेही त्याला आपल्या मस्तकावर घेतले. गजाननाने आपल्या उदराभोवती राहावयास त्याला जागा दिली. हि शेषाने स्थापन केलेली मूर्ती सध्या प्रवाळ नगरात आहे.

1 comments:

Unknown म्हणाले...

gajananala 21 modakachech naivaidya ka dakhavtat?

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters